राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी १० जून पर्यंत प्रस्ताव पाठवा June 05, 2020 • RAVI KHADSE राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी १० जून पर्यंत प्रस्ताव पाठवा वाशिम, दि. ०४ (जिमाका) : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालयामार्फत सन २०१७-१८ व २०१८-१९ राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २६ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर स्वीकारण्यात येणार आहेत. तथापि, केंद्र सरकारच्या पत्रात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी व त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक पात्रता धारक असणाऱ्या पुरस्काराच्या अनुषंगाने कागदपत्रे सोबत जोडून परिपूर्ण प्रस्ताव १० जून २०२० पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावा. अधिक माहितीकरिता व अर्जाच्या नमुन्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे.